छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. याच दिवशी हिंदुसाम्राज्यदिन साजरा केला जातो. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. त्याप्रमाणे रामनाथी येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भव्य उत्साहात प्रारंभ होणे, हाही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. हा ईश्वरी योगायोग असल्याचा संकेत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री भवानीदेवी, समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज अशा देवता अन् संत यांच्या आशीर्वादाने मुसलमान आक्रमकांच्या संकटातून हिंदूंचे रक्षण करून हिंदवी स्वराजाची स्थापना केली, त्याप्रमाणे हिंदु धर्म आणि हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी देवता, महर्षि अन् संत यांचे आशीर्वाद घेऊन संघटित होणे, तसेच येणार्या अडथळ्यांवर मात करत कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा निश्चय या अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आला, हे अधिवेशनाचे वैशिष्ट्य होते.
अधिवेशनात मध्ये मध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृह दणाणून गेले.
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला स्वागताचा फलक
क्षणचित्रे
१. कोरोनाच्या संकटानंतर २ वर्षांनी सर्व हिंदुत्वनिष्ठ प्रथमच अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्रित भेटले. त्या वेळी सर्वांच्या तोंडवळ्यावर उत्साह आणि आनंद जाणवत होता, तसेच सर्वांमध्ये एकत्र कुटुंबभावना दिसून आली. याच समवेत सर्वांनी एकमेकांची आपुलकीने चौकशी केली.
२. अधिवेशनाच्या तिसर्या सत्रात ‘धर्मरक्षणासाठी कायदेशीर संघर्षाची दिशा’ या विषयावर पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता सुशील अत्रे आणि अधिवक्ता नागेश जोशी यांनी मार्गदर्शन केले.