महिलांच्या मानवाधिकारांना आणि लैंगिक समानतेला धक्का ! – संयुक्त राष्ट्रे

वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रहित करण्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महिलांच्या मानवी अधिकारांना आणि लैंगिक समानतेला ‘मोठा धक्का’ असल्याचे म्हटले आहे. गर्भपात प्रतिबंधित केल्याने लोकांना त्याविषयी मागणी करण्यापासून आपण रोखू शकत नाही आणि ते अधिक प्राणघातक होईल. सुरक्षित, कायदेशीर आणि प्रभावी गर्भपाताचा प्रवेश आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात समाविष्ट आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बाचालेट यांनी सांगितले. या गर्भपात बंदीमुळे महिला आणि मुली असुरक्षित प्रक्रियेकडे वळण्याची शक्यता अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे.