शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक
मुंबई – स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले. शिवसेना म्हणजे निखारा आहे. त्यावर पाय ठेवला, तर जाळून टाकू, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका करतांना केले. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. ‘बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे अधिक प्रेम आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
(सौजन्य : Aaj Tak)
या वेळी उपस्थितांनी ‘गद्दारांना परत घेऊ नका’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना परत घेणारच नाही.’’
कार्यकारिणीत मांडण्यात आलेले ५ महत्त्वाचे ठराव !१. ‘बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना’ ही नावे कुणालाही वापरता येणार नाहीत. |