मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक भागांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले.

 (सौजन्य : Zee 24 Taas)

शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी २५ जूनपासून १० जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचसमवेत मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने-शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.