खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडले  

४ ते ५ कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

उल्हासनगर – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे येथील कँप २ भागातील मध्यवर्ती कार्यालय २५ जून या दिवशी दुपारी फोडण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी घटनास्थळावरून ४ ते ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ कह्यात घेतले आहे. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे एक महत्त्वाचे शहर आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुणे आणि धाराशीव येथील कार्यालयेही सकाळी फोडण्यात आली.