संभाजीनगर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी येथे विराट सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार सिद्धता करण्यात आली आहे. या सभेला लक्षावधी लोक येतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्यासपिठाच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. या सभेसाठी सहस्रो भगवे झेंडे मागवण्यात आले आहेत. याविषयी शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, संभाजीनगरची सभा ही विराट होणार आहे. औरंगाबादचे नामांतर होणार कि नाही ? या विषयावर उद्धव ठाकरे बोलतील. संभाजीनगर येथील पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सनदी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे पाणी, तर आम्ही देणारच आहोत. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव संमत करावा.