पिंपरी (पुणे) येथे ६० लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – मुंबई-बेंगळुरू महामार्गावर तळेगाव टोलनाका परिसरात उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विदेशी मद्याचा मोठा साठा पकडला. हे मद्य गोवा राज्यात विक्रीसाठी नेले जात होते. पकडण्यात आलेल्या २ कंटेनरमधून अनुमाने ६० लाख रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले असून दोन्ही कंटेनरही कह्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने चालक जयकिशन ढाका आणि सुजानाराम बिष्णोई यांना अटक केली असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे दोघेही राजस्थान येथील रहिवासी आहेत.