श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अधिवक्ता दत्ता सणस, हिंदु महासभा

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे मागणी !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून या दिवशी सकाळी ७ वाजता शेगावहून प्रस्थान झाले. गजानन महाराजांच्या पालखी वारीचे हे ५३ वे वर्ष आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानात अमृत गटामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय !

याचे पारितोषिक वितरण ५ जून या दिवशी टाटा थिएटर, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचा ठाणे येथे मोर्चा !

आरोग्य सेवा देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आधुनिक वैद्यांच्या जागी मांत्रिकांची नियुक्ती करावी, अशी उपरोधिक मागणी करत श्रमजीवी संघटनेने येथील साकेत मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढला.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा  !

कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ अवैध !

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ (मर्दन करण्याचे ठिकाण) अवैध असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार गोव्यात कार्यरत असलेले ‘मसाज पार्लर’ची सरकार दरबारी नोंदणी करतांना वेगळ्या नावाने करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील भारतातील एकमेव ‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठीच्या भत्त्यात वाढ करावी !

‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सनील घनवट यांनी येथील शिवसेना आमदार श्री. वैभव नाईक यांना निवेदन दिले.

कोल्हापूर येथे शिवसेनेच्या वतीने राज्याभिषेक सोहळा उत्साहात !

येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवा नेते ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला.

कोल्हापुरात जैन-मारवाडी समाजाकडून महाराणा प्रताप जयंती साजरी !

कोल्हापुरात जैन-मारवाडी समाजाकडून महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महावीर गार्डन येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात जागा !

काश्मिरी पंडितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.