कोल्हापूर, ६ जून (वार्ता.) – कोल्हापुरात जैन-मारवाडी समाजाकडून महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महावीर गार्डन येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, मारवाडी समाजातील नरेंद्र ओसवाल, ठाकूर मोहब्बत सिंग देओल, माजी नगरसेवक ईश्वर परमार, राजेश ओसवाल, शंकरसिंह चरण, प्रवीण मनियार, उदय शहा, के.जी. ओसवाल, दिलीप गांधी यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी ठाकूर मोहब्बत सिंग देओल म्हणाले, ‘‘महाराणा प्रताप यांनी मोगल साम्राज्याशी कडवी झुंज दिली. सम्राट अकबराच्या अफाट सेनेशी आयुष्यभर लढा दिला. अनेक राजे-महाराजे अकबराच्या छावणीत आले; मात्र महाराणा प्रताप यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही. त्यांची हल्दी घाटातील लढाई आजही हिंदुत्वासाठी प्रेरणादायी आहे.’’