मुंबई – काश्मिरी पंडितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी शिवसेनेने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर उच्च- तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काश्मिरी पंडितांसाठी अभ्यासक्रमात जागा देण्याची घोषणा केली आहे.