श्री महालक्ष्मी मंदिराचा समावेश केंद्रशासनाच्या प्रसाद योजनेत होण्याकरता राज्यशासनाने सकारात्मक पावले उचलावीत ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे भारतातील ५१ शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. केंद्रशासनाच्या वतीने अशी मोठी मंदिरे आणि त्यांना भेट देणारे भाविक यांच्यासाठी प्रसाद योजना चालू करण्यात आली आहे.

मुंबई येथे मशिदीत ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंद !

१३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले.

पुण्यातील ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाविषयी मला काहीही माहिती नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाविषयी महापालिकेने मागच्या काळात निर्णय घेतला आहे. याविषयी वृत्तपत्रांमध्ये परस्परविरोधी वार्ता येत आहेत; मात्र मला याविषयी काहीही माहिती नाही.

शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याविषयीची माजी गृहमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात अद्ययावत् सुविधांचा अभाव असल्याने खांद्यावरील शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याची अनुमती मिळावी, अशी सत्र न्यायालयाकडे मागणी केली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘विशाळगड ते पन्हाळगड’ गडकोट मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी रवाना !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या १४ ते १७ मे या कालावधीत विशाळगड ते पन्हाळगड (मार्गे) पावनखिंड या होत असलेल्या गडकोट मोहिमेसाठी धारकरी सकाळी सांगलीतून विशाळगडाकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका साहाय्यक आयुक्त श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.

१४ ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ !

१४ मे ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ होणार असून पावनखिंड मार्गातून ही मोहीम पुढे जाणार आहे.

संभाजीनगर येथे पाणीपट्टी २ सहस्र रुपयांनी अल्प करण्यात येणार ! – सुभाष देसाई, पालकमंत्री

शहरात ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या संभाजीनगरकरांमध्ये महापालिका आणि राज्य सरकार यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. गेल्या १ मासापासून आंदोलनेही केली जात होती.

‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी !

‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी परिसरातील महिलांनी पाळणा पूजन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी लाठी-काठी आणि लेझीम खेळांच्या प्रात्यक्षिकासह शहरात मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढली.

हिमत असेल, तर अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा !

हिंमत असेल, तर ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिले आहे.