सांगली, १४ मे (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या १४ ते १७ मे या कालावधीत विशाळगड ते पन्हाळगड (मार्गे) पावनखिंड या होत असलेल्या गडकोट मोहिमेसाठी धारकरी सकाळी सांगलीतून विशाळगडाकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका साहाय्यक आयुक्त श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. या वेळी धारकरी सर्वश्री मिलिंद तानवडे, अनिल तानवडे, राजू पुजारी यांसह अन्य उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी कोल्हापूर येथील विशाळगडावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.
कोल्हापूर शहर, तसेच पन्हाळा येथे मोहिमेच्या स्वागताचे भव्य होर्डिंग्ज, कमानी लावण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरासह ठिकठिकाणाहून धारकरी मोठ्या संख्येने मोहिमेसाठी विशाळगडकडे रवाना झाले.