‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी !

‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करतांना कार्यकर्ते
‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त परिसरातील महिलांनी पाळणा पूजन केले

कोल्हापूर, १४ मे (वार्ता.) – ‘राजे संभाजी स्मारक समिती’च्या वतीने पापाची तिकटी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी परिसरातील महिलांनी पाळणा पूजन केले. या प्रसंगी वाहतूक पोलीस निरिक्षक स्नेहा गिरी, शिला माजगावकर, मेघा पुरेकर, प्रतिभा माजगावकर, पद्मजा माजगावकर, शर्मिला वाघवेकर, मनीषा ब्रह्मपुरे, सुमन वाघवेकर, पार्वती वाघवेकर, उषा पाटील यांसह ‘राजे संभाजी स्मारक समिती’चे ओंकार शिंदे, सौरभ निकम, नितीन ब्रह्मपुरे यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी लाठी-काठी आणि लेझीम खेळांच्या प्रात्यक्षिकासह शहरात मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढली.

मिरज – भाजपच्या वतीने मिरज येथील आमदार सुरेश खाडे यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

मिरज येथे भाजप आमदार सुरेश खाडये यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले