खासदार नवनीत राणा यांचे राज्य सरकारला आव्हान
नवी देहली – हिंमत असेल, तर ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सभेचा प्रारंभ औरंगजेबाचे नाव घेऊन करतील का ? ठाकरे यांना जनता धडा शिकवणार असून औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का ?’, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
अमरावती येथील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या देहली येथे असून त्यांनी १३ मे या दिवशी देहली येथील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. ‘राज्य सरकारच्या मुक्तीसाठी ही महाआरती करत आहे’, असे त्यांनी सांगितले. मुंबई येथील ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या उद्देशाने आलेल्या राणा दांपत्याला कारागृहात जावे लागले होते. कारागृहातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी पतीसमवेत थेट देहली गाठली आणि तेव्हापासून दोघेही तेथेच थांबले आहेत.