नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शारदा विश्‍वविद्यालयाच्या प्रश्‍नपत्रिकेत हिंदुत्वाची नाझीवादाशी तुलना !

शारदा विश्‍वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

अमित शहा यांच्या दौर्‍यापूर्वी कोलकातामध्ये भाजप कार्यकर्त्याचा फासावर लटकवल्याच्या अवस्थेत सापडला मृतदेह !

भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एवढेच कशाला भाजपच्या अनेक नेत्यांवर यापूर्वीही जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. ही रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने धोरणात्मक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढल्यास मारहाण करू !

कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटाद्वारे मुसलमान तरुणींनाच धमकी !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ओरड करणारी पुरोगामी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ?

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणावर येत्या १९ मे या दिवशी न्यायालय निर्णय देणार !

कटरा केशव देव मंदिराची देवता श्रीकृष्ण विराजमान आणि अन्य ६ जण यांनी रंजना अग्निहोत्री यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात येणार आहे.

यावर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

यावर्षी २० किंवा २१ मे या दिवशी अंदमानमध्ये पावसाळा प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर केरळमध्ये पावसाळा चालू होतो. अंदाजानुसार केरळमध्ये २८ ते ३० मे या काळात पावसाळा चालू होऊ शकतो.

मशिदींवर भोंगे लावून अजान देणे हा मूलभूत अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी आणखी किती वेळा असा आदेश दिल्यानंतर त्यानुसार मुसलमान कृती करणार आणि पोलीस त्यांना कृती करण्यास भाग पाडणार ?

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह १० जणांना कारावास

यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पटेल यांचाही समावेश आहे. 

शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्या सर्वेक्षणाला मुसलमानांचा विरोध करण्याचा प्रयत्न !

‘वाराणसीमध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने रहातात’, असे म्हणणार्‍यांना चपराक ! ‘न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्‍या चित्रीकरणाला अशा प्रकारे विरोध का करण्यात आला ?’, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी दिले पाहिजे !

मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली.

हरियाण पोलिसांनी बग्गा यांना देहली पोलिसांकडे सोपवले !

देहलीमधील भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल बग्गा यांना पंजाब येथील पोलीस अटक करून पंजाबमध्ये नेत असतांना हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले. तसेच बग्गा यांना कह्यात घेतले.