नवी देहली – बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे. यासंदर्भात ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने अंदाज वर्तवला आहे.
दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन 10 दिवस आधीच होणार…#monsoon #monsoonnews #keralamonsoon https://t.co/BpdEUj8LF9
— ABP माझा (@abpmajhatv) May 6, 2022
भारतात सर्वप्रथम अंदमान येथे पावसाळ्याला प्रारंभ होतो. यावर्षी २० किंवा २१ मे या दिवशी अंदमानमध्ये पावसाळा प्रारंभ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर केरळमध्ये पावसाळा चालू होतो. अंदाजानुसार केरळमध्ये २८ ते ३० मे या काळात पावसाळा चालू होऊ शकतो. यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.