कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या व्हॉट्सअॅप गटाद्वारे मुसलमान तरुणींनाच धमकी !
मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा दावा करणार्या ‘डिफेन्स फोर्स’ या व्हॉट्सअॅप गटाने सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालता जाणार्या मुसलमान तरुणींना धमकी दिली आहे. ‘जर मुसलमान तरुणी बुरखा न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्या, तर त्यांना मारहाण करण्यात येईल’, अशी धमकी मुसलमान तरुणींना देण्यात आली आहे.
‘Women who don’t wear burqa and who remove burqa to take selfies will be thrashed’: Muslim group in Mangaluru issues threatshttps://t.co/N9hMcAqOEO
— OpIndia.com (@OpIndia_com) May 5, 2022
या धमकीची नोंद मंगळुरू पोलिसांनी घेतली असून पोलीस चौकशी करत आहेत. मुसलमान तरुणींनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढू नये, तसेच ‘सेल्फी’ (भ्रमणभाषद्वारे स्वतःचे छायाचित्र काढणे) घेऊ नये, असेही या धमकीमध्ये म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ओरड करणारी पुरोगामी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ? |