अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार ! – नवनीत राणा, खासदार

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांना भेटण्यास पालिका आयुक्तांचा नकार !

पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदने सादर !

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथा रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन आणि ८० हून अधिक शाळा-महाविद्यालये यांमध्ये निवेदन देण्यात आले.

भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !

‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?

आजी-माजी संचालकांना वसुलीच्या नोटिसा !

अशी नोटीस पाठवण्याची कारवाई राज्यातील इतर बँका, पतसंस्था आणि सेवासंस्था यांमध्ये घोटाळा करणार्‍या आजी-माजी संचालकांवर होणे आवश्यक आहे; कारण थकबाकीची वसुली न होण्यास कर्जदारासमवेत हेही उत्तरदायी असतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून केंजळ (जिल्हा सातारा) ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने !

रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले !

देशातील वाढत्या कोरोनाला काँग्रेस उत्तरदायी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विरोधात काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपच्या शहराध्यक्षांसह ४०० कार्यकर्त्यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

पुणे महापालिकेत किरीट सोमय्या आले असतांना झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर यांच्यासह ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हिजाबचे समर्थन करणारे याविषयी कधी बोलणार ?

मुर्शिदाबाद (बंगाल) येथील शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थिनी बुरखा आणि हिजाब घालून आल्यावर शिक्षकांनी त्यांना शाळेत येण्यापासून रोखल्याने धर्मांधांच्या जमावाने शाळेची तोडफोड केली.

वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणाचा निर्णय वर्ष २०२२ मध्ये येणे हा न्याय नव्हे, तर अन्याय आहे ! 

शहरातील २० ठिकाणी झालेल्या २१ बाँबस्फोटांच्या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४६ जण गंभीररित्या घायाळ झाले होते.’

मतदारांनो हे लक्षात घ्या !

‘राजकारणी लोकांना मायेत अडकवतात, तर साधक स्वतः मायेतून मुक्त होतात आणि इतरांनाही ‘मायेपासून मुक्त कसे व्हायचे’, ते शिकवतात.’