पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदने सादर !

पुणे, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथा रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोहीम राबवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन आणि ८० हून अधिक शाळा-महाविद्यालये यांमध्ये निवेदन देण्यात आले.

१. पुणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. हिम्मत खराडे यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णा पाटील, श्री. सुधीर दराडे, श्री. शशांक सोनवणे, कु. चारुशीला चिंचकर, कु. कल्पना वाटकर यांनी निवेदन दिले.

२. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, पुणे शहर यांच्या वतीने साहाय्यक पोलीस आयुक्त श्री. साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले.

३. आगरकर मुलींची शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती इंदुमती दराडे यांना निवेदन दिल्यानंतर शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर निवेदनातील मजकूर समितीच्या नावे देणार असल्याचे सांगितले. तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या संदर्भात मुलींचे प्रबोधन करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

उजवीकडे आगरकर मुलींची शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती इंदुमती रावसाहेब दराडे यांना निवेदन देतांना डावीकडे सौ. प्राजक्ता काळे.
पुणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, श्री. हिम्मत खराडे यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णा पाटील, (डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर दराडे, कु. चारूशीला चिंचकर, कु. कल्पना वाटकर, श्री. कृष्णा पाटील आणि निवेदन स्वीकारतांना श्री. हिम्मत खराडे)
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. राजेश पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. मिलिंद धर्माधिकारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर सौ. उषा ढोरे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना (डावीकडून) श्री. मिलिंद धर्माधिकारी, श्री. संजय घुले

वैशिष्ट्यपूर्ण

. राजगड ज्ञानपीठ यांच्या एम्.बी.ए. कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाचे श्री. किरण आबनावे, तसेच धनकवडी येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषद अध्यापक महाविद्यालय, सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालय येथे ‘व्हॅलेंटाईन डे’चा विषय ऐकून घेऊन निवेदनाची प्रत त्यांच्या सूचना फलकावर लावली.

२. मानाजीनगर, नर्‍हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनचे मुख्याध्यापक श्री. शार्दुल जाधवर यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ‘हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य आणि घेत असलेले विषय पुष्कळ चांगले आहेत. त्यामुळे दर मासात एका व्याख्यानाचे आयोजन करावे. आम्ही संपूर्ण सहकार्य करू’, असे सांगितले.

३. निवेदनाच्या छायांकित प्रती काढलेल्या दुकानाचे मालक श्री. पाटील यांनी स्वतःहून विषय समजून घेतला आणि निवेदनाची एक प्रत त्यांच्या दुकानात दर्शनी भागात लावली.

. शिकवणी घेणार्‍या संचालिका कुमारी ऋतुजा शेलार यांनी त्यांच्या शिकवणीवर्गात येणार्‍या १५ मुलांना निवेदन वाचून दाखवले आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याविषयी सांगून आपण त्याचा निषेध करूया, असे सांगून मुलांचे प्रबोधन केले.

५. सासवड येथील गुरुकुल माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हाके सर यांनी ‘आम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ हा विषय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सांगून पाश्चात्त्य प्रथांमुळे होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव करून देऊ’, असे सांगितले.

. जिल्ह्यातील बर्‍याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवेदन स्वीकारतांना ‘‘व्हॅलेंटाईन डे’ ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊ’, असे सांगितले.

७. पिंपरी-चिंचवड, राजगुरुनगर, जुन्नर आणि तलीगाव येथील प्रशासकीय कार्यालये, तसेच विविध शाळा-महाविद्यालये यांमध्ये निवेदने देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयुक्तांचे सहाय्यक श्री. कल्याणकर यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी ‘आम्ही प्रतिवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने कारवाई करत असतो. तुम्ही लवकर आठवण करून दिली हे चांगले झाले. मी याविषयी त्वरित कारवाईसाठी प्रयत्न करतो’, असे सांगितले. हे निवेदन देतांना समितीचे सर्वश्री नीलेश यादव आणि मिलिंद धर्माधिकारी उपस्थित होते.

८. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि महापौर सौ. उषा ढोरे यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या वेळी सौ. उषा ढोरे यांनी ‘महिलांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. पालकमंत्री, पोलीस आयुक्त यांच्या समवेत होणार्‍या बैठकीत हा विषय मांडते. कार्यालयातून पोलीस आयुक्तांना पत्र पाठवते आणि प्रसिद्धीपत्रकही काढते’, असे सांगितले.

. हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, बाबूराव घोलप महाविद्यालय, नरसिंह प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय यांसह आतापर्यंत १३ हून अधिक महाविद्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले आहे.