जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

भारतात इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येतात; मात्र त्यांपैकी कुणीही या प्रकरणी पुढे येऊन अशा याचिकांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या त्यागाचे मूल्यमापन होऊ शकत नाही ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

या वेळी खासदार भोसले यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान युद्धातील २२ हून अधिक माजी सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पेपरफुटीमुळे म्हाडाची परीक्षा रहित !

परीक्षेतील दलाल आणि पेपरफुटी यांमुळे म्हाडाच्या विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा अचानक रहित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापूर्वीच्या मध्यरात्रीला ही घोषणा करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली. 

कोल्हापूर येथे १४ ते १६ जानेवारी या काळात पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन !

कोरोना संसर्गाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवी मूल्य आणि विश्वबंधुता यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यावर गुन्हा नोंद !

वर्ष २०१७ मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पारपत्राच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देशासमोरील समस्यांवर आपल्यालाच उपाय शोधायचे आहेत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशासमोर अनेक समस्या असून त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले आहे. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत  होते.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे हीच काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, राष्ट्रीय वारकरी परिषद

पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न

नेवासे (नगर) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रह्मचारी महाराजांचे देहावसान !

११ डिसेंबर या दिवशी दुपारी संत, महंत आणि भाविक यांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून जुन्नर (पुणे) येथील हबशी महालाचा विकास !

वास्तविक हिंदूंच्या मंदिरांचा निधी हा हिंदु धर्माच्या कार्यासाठीच व्यय व्हायला हवा. असे असतांना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांतील सरकारांनी केवळ हिंदूंच्या असंख्य मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती अधार्मिक गोष्टींवर उधळली आहे.