नेवासे (जिल्हा नगर) – तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रह्मचारी महाराज यांचे १० डिसेंबरला रात्री १० वाजता देहावसान झाले. ११ डिसेंबर या दिवशी दुपारी संत, महंत आणि भाविक यांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत ऋषीनाथ महाराज यांच्यासह पू. बाबांचे पुतणे जम्मूचे खासदार जुगलकिशोर शर्मा आदी उपस्थित होते.