मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने सनातनची व्यक्तीमत्त्व विकास, बालसंस्कार, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील प्रकाशित अनमोल ग्रंथसंपदा जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाणार ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून दिले आहे. 

स्वतंत्र विदर्भ राज्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही ! – केंद्र सरकार

वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिले.

सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर आणि चिंचवड (पुणे) येथील जिज्ञासूंसाठी दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अधिवक्त्या सुधा भारद्वाज यांना जामीन संमत !

या प्रकरणातील अन्य ८ आरोपींचा जामीनअर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला आहे. १ डिसेंबर या दिवशी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.

दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती !

कर्जवसुलीला स्थगिती विषयी ३० नोव्हेंबर या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला असून याविषयीचे निर्देश शासनाकडून अधिकोषांना देण्यात आले आहेत.

साई संस्थानला कामकाजास मुभा; मात्र धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयावर निर्बंध ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या समवेत निवडण्यात आलेल्या एकूण १२ विश्वस्तांना कामकाज पहाण्यास यापूर्वी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिलेली स्थगिती ३० नोव्हेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने उठवली.

कोकणातील नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर महाड येथे स्थापन होणार ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे कायमस्वरूपी पथक !

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्यास अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना जलद गतीने साहाय्य उपलब्ध होऊ शकते.

राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती !

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीताराम कुंटे यांनी देबाशीष चक्रवर्ती यांच्याकडे पदभार सोपवला आहे.

संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील ३ आधुनिक वैद्यांना रुग्णाच्या नातेवाइकांकडून मारहाण !

आधुनिक वैद्यांना मारहाण करून समस्या सुटणार आहे का ? अशा प्रकारच्या वागणुकीचे आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन समस्या योग्य पद्धतीने सोडवण्यावर भर द्यायला हवा !