दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती !

मुंबई, १ डिसेंबर (वार्ता.) – मध्यम दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. याविषयी ३० नोव्हेंबर या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला असून याविषयीचे निर्देश शासनाकडून अधिकोषांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला. यासह पहिल्या कर्जाची रक्कम भरू न शकणार्‍या शेतकर्‍यांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी मध्यम कालावधीचे कर्ज देण्याचे निर्देश शासनाकडून अधिकोषांना देण्यात आले आहेत. मध्यम दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठण करण्याचा आदेशही शासनाकडून देण्यात आला आहे.