भारताची अधिकृत दिनदर्शिका : भारतीय सौर कालगणना
भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.