पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे, जो सत्त्व, रज आणि तम या तत्त्वांवर विश्वास ठेवतो. आपल्या संस्कृतीने निसर्गाशी कधीच खेळ केला नाही. पाश्चात्त्य देशांनी स्वार्थासाठी जैविक अभियांत्रिकीच्या (genetic engineering च्या) नावाखाली निसर्गाने दिलेल्या सर्व खाद्यपदार्थांसमवेत खेळ केला आणि करत आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये रज-तम प्रधान खाद्यपदार्थ खाल्ल्याने कर्करोगासारखे भयंकर रोग महामारीसारखे पसरत आहेत. आजच्या हिंदूंना धर्मज्ञान नसल्यामुळे ते पाश्चात्त्य तमोगुणी संस्कृती, भोजन, संगीत, वस्त्र यांकडे आकृष्ट होऊन, त्यांचे भरभरून कौतुक करून आणि ते अंगीकारून रोगग्रस्त होतात.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (१५.११.२०२१)