अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ?

दुर्गेश जयवंत परुळकर

१. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

‘मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भेट किंवा देणगी राज्यघटनेने दिली आहे. ‘माझ्या मनाला हवे ते बोलीन. मी माझ्या मनाला वाटेल तसा वागेन’, असा भयंकर आत्मघातकी आणि राष्ट्रघातक अर्थ आज काढला जातो. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, ही गोष्ट गंभीर आहे.

२. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे इंद्रिये, मन आणि वाणी यांच्यावर नियंत्रण ठेवणे

आपली संस्कृती सांगते, आपला धर्म सांगतो की, ‘मानवाच्या खर्‍या खुर्‍या शांतीचे आणि समाधानाचे रूप संयम आहे, इंद्रिये, मन आणि वाणी यांच्या नियंत्रणावर आधारलेले आहे. ‘जितेंद्रिय होणे’, हाच माणसाचा खरा धर्म आहे. माणसातील माणुसकी टिकून रहाते, ती केवळ स्वतःवर असलेल्या नियंत्रण शक्तीवर ! ही नियंत्रण शक्तीच सभ्यतेचे, सज्जनतेचे आणि सुशिक्षितपणाचे लक्षण आहे.’

– सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश जयवंत परुळकर (संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१७)