‘भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीपुत्रांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली, घरादारावर तुळशीपत्र ठेवून मातृभूमीसाठी शौर्य गाजवले; पण गेल्या ७४ वर्षांमध्ये आम्हाला हा शौर्यशाली इतिहास न शिकवल्यामुळे आज भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याची पराकाष्ठा करून भारतमातेला पुनर्वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया.’