बंदमुळे झालेली हानी सत्ताधार्‍यांच्या खिशातून भरून काढा ! – भातखळकर, आमदार, भाजप

पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाड येथील दुकानदारांना पोलिसांच्या साहाय्याने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगणार्‍या शिवसेनेचा प्रयत्न आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

मुंबई पोलीस माझ्यावर पाळत ठेवत आहेत ! – समीर वानखेडे, अधिकारी, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याची सूचना कुणालाही दिली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !

सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिले होते.  

शेतकरी असेल तरच देश वाचणार ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजप

महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी असेल, तरच देश वाचणार आहे. त्यामुळे सत्ता कुणाचीही असो, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे दायित्व प्रत्येक लोकप्रतिनिधींचे आहे, असे मत सातारा येथील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

बुलढाणा येथे कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करणार्‍या आयोजकांवर गुन्हा नोंद !

अनेक राजकीय कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या वेळी कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्या वेळीही पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे !

सईद खान यांच्या चौकशीसाठी ‘ईडी’चे पथक पुन्हा वाशिम येथे आले !

रस्त्याचे काम या आस्थापनाकडून नंतर सईद खान यांच्या ‘भूमी कन्स्ट्रक्शन आस्थापना’ला देण्यात आले आहे. यावरून वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ‘ईडी’च्या पथकाकडून चौकशी चालू आहे.

सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा !

सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची विशेष अलंकार रूपातील पूजा बांधण्यात आली होती. महालक्ष्मी मंदिरात अंबामातेचे हे अनोखे रूप पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पुणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारल्याचा एका सर्वेक्षणात दावा !

अजूनही खासगी रुग्णालय नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारतात, हे गंभीर आहे. रुग्णालयांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम !

लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या परिसरात ती सुविधा उपलब्ध करून देणार ! – मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

शहरातील महाविद्यालये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून १२ ऑक्टोबरपासून चालू होत आहेत. लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असून पुण्याबाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक आहे.

परळी (जिल्हा बीड) येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २ दिवस पुरेल एवढाच कोळसा !

राज्यात सध्या १३ संच बंद पडलेले आहेत; परंतु परिस्थिती बिघडली, तर शेतीपंप आणि शहर यांसाठी भारनियमनाची शक्यता आहे.