पुणे – शहरातील महाविद्यालये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून १२ ऑक्टोबरपासून चालू होत आहेत. लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असून पुण्याबाहेरून येणार्या विद्यार्थ्यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.