शेतकरी असेल तरच देश वाचणार ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, भाजप

कोल्हापूर, १२ ऑक्टोबर – महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी असेल, तरच देश वाचणार आहे. त्यामुळे सत्ता कुणाचीही असो, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्याचे दायित्व प्रत्येक लोकप्रतिनिधींचे आहे, असे मत सातारा येथील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या लोकांच्या हाती असल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे. सध्या जाती-जातीत निर्माण होत असलेली तेढ चुकीची आहे. प्राप्तीकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टाकलेल्या धाडी योग्य असून जे पेरले आहे तेच उगवणार आहे. यापूर्वी निवडणुकांच्या माध्यमांतून जनतेचा पैसा वापरला होता. तोच पैसा आता ‘ईडी’सारख्या संस्थांच्या माध्यमातून जनतेला परत जात आहे.’’