अनेक राजकीय कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या वेळी कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्या वेळीही पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक
बुलढाणा – ‘बिग बॉस मराठी ३’ या मालिकेमुळे चर्चेत आलेल्या आणि प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन केल्याप्रकरणी देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
या कीर्तनाला लोकांची पुष्कळ गर्दी झाली होती. जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि कोरोनाच्या नियमावलींचे पालन न केल्याने पोलिसांनी जिजाऊ दुर्ग उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक संदीप राऊत, गणेश मोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या कीर्तनासाठी जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाने कोणतीही अनुमती घेतली नव्हती.