पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७७ कोटी रुपयांची दंड आकारणी !

अनेकांना त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आल्याचे संदेश येतात; मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पोलिसांनी कितीही दंड आकारणी केली तरी तो वसूल होण्याचे प्रमाण प्रतिदिन न्यून होत आहे.

९ वर्षे जुन्या प्रकरणाचा दाखला देऊन गणेश मूर्तीकारांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

‘११ सप्टेंबर २०१२ या दिवशी मूर्तीकारांना सशर्त ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीची विक्री करण्याची अनुमती देण्यात आली होती. त्या वेळी मूर्तीकारांनी ‘भविष्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती सिद्ध आणि विक्री करणार नाही’, अशी हमी दिली होती.

चौल (रामनाथ) येथील श्री नवनाथ संप्रदायाचे पू. नारायण वार्डेगुरुजी यांचा देहत्याग !

पू. गुरुजी दैनिक ‘सनातन प्रभात’चे बारकाईने वाचन करत. ते गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश आणि सनातन संस्थेच्या संस्कार वह्या देत असत.

नागपूर विद्यापिठाच्या ‘लोकप्रशासन विभागा’चे प्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंह यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड !

कुलगुरूंनी डॉ. निर्मलकुमार सिंह यांच्याकडून ४ लाख रुपये वसूल केले !

बोरी (फोंडा) येथे एकाच कुटुंबात आढळले ९ कोरोनाबाधित !

या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच मुंबईला जाऊन आली होती. मुंबईहून परतल्यानंतर या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती, असे डॉ. रेडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत राज्यात ६० लाख, तर मुंबईत दिवसाला १ लाखाहून अधिक रुग्ण आढळू शकतील ! – आरोग्य विभाग

तिसर्‍या लाटेत मुंबईसाठी २५० मेट्रिक टन, पुण्यासाठी २७० मेट्रिक टन, ठाण्यासाठी १८७ मेट्रिक टन, नागपूरसाठी १७५ मेट्रिक टन, तर नाशिकसाठी ११४ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते.

गोंदिया येथे ‘एस्.टी’च्या तिकीट वेंडिंग यंत्रणेच्या स्फोटात महिला वाहक घायाळ ! 

वाहकांनी तिकीट वेंडिंग यंत्रणेत वारंवार दोष निर्माण होत असल्याच्या तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करणार्‍या ‘एस्.टी.’ महामंडळाच्या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

पुढील १० ते १५ वर्षांत पेट्रोलवर चालणारी वाहने रस्त्यावरून हटवणार ! – पर्यावरणमंत्री

सांकवाळ येथील कवळेकर पेट्रोल पंपमध्ये गोव्यातील पहिल्या ‘सी.एन्.जी.’ केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पर्यावरणमंत्री काब्राल बोलत होते.

रक्षाबंधनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याशी संवाद

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !

‘गोवा मायनिंग पीपल्स फोरम’ ही संघटना निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी नवीन मंच स्थापन करणार

‘गोवा मायनिंग पीपल्स फोरम’ (जी.एम्.पी.एफ्.) ही संघटना निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी नवीन मंच स्थापन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पुती गावकर यांनी दिली आहे.