पणजी, २७ ऑगस्ट (वार्ता.) – शासन ‘सी.एन्.जी.’सारख्या पर्यावरणासाठी अनुकूल इंधनाला प्रोत्साहन देऊन पुढील १० ते १५ वर्षांत पेट्रोल किंवा डिझेल यांवर चालणारी वाहने रस्त्यावरून हटवणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. सांकवाळ येथील कवळेकर पेट्रोल पंपमध्ये गोव्यातील पहिल्या ‘सी.एन्.जी.’ केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पर्यावरणमंत्री काब्राल बोलत होते. ‘इंडियन ऑईल’ आणि ‘अदानी गॅस प्रा.लि.’ यांच्या सहयोगाने ‘सी.एन्.जी.’ स्टेशन चालू करण्यात आले आहे.