फोंडा – बोरी (फोंडा) येथे एकाच कुटुंबात ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये २ वयस्कर पुरुष आणि लोटली प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला दंतचिकित्सक यांचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी या घराचा परिसर सूक्ष्म प्रतिबंध क्षेत्र घोषित केला आहे, अशी माहिती शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता रेडकर यांनी दिली. या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच मुंबईला जाऊन आली होती. मुंबईहून परतल्यानंतर या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती, असे डॉ. रेडकर यांनी सांगितले.