मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !

मुंबई – नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, संपादक, अधिवक्ता, उद्योजक, मंदिराचे विश्वस्त आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भ्रमणभाषवरून संपर्क करण्यात आला.
कोरोनाच्या महामारीमुळे असलेल्या निर्बंधांमुळे यावर्षीही प्रत्यक्ष भेटण्यास मर्यादा असल्याने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या आणि सनातन संस्थेच्या साधिका यांनी दूरभाषद्वारे राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना शुभेच्छा दिल्या, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात योगदान देण्याचे आवाहनही केले. यावर अनेकांनी या कार्यात यापुढेही योगदान देणार असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रतिक्रिया
एक ज्येष्ठ पत्रकार : सनातनचे लोक टीका वगैरे सहन करून धर्मासाठी ज्या प्रकारे काम करतात, ते कौतुकास्पद आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो. तुम्हाला हिंदुत्वनिष्ठ संघटनाही फार सहकार्य करत नसतांनाही तुम्ही ज्या निष्ठेने आणि निरपेक्षपणे कार्य करता, खरेच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मी मनापासून कृतज्ञ आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !