मुंबई – शासकीय सेवेत असतांना गट ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचार्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. याप्रमाणे आता गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील अधिकार्यांचा शासकीय सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातीलही एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.