बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

इस्लामिक स्टेटला जसा इस्लामी देशांनी विरोध केला नव्हता, तसेच ते तालिबानलाही विरोध करत नाहीत उलट त्याला उघडपणे समर्थन देत आहेत, हे भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घेऊन भारतात ही स्थिती येऊ न देण्यासाठी राष्ट्रनिष्ठ झाले पाहिजे !

भगवद्गीता बालपणातच सोप्या भाषेत प्रत्येकापर्यंत पोचणे आवश्यक ! – पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल, गोवा

‘कृतार्थ’च्या वतीने प्रकाशित केवळ १८ श्लोकांमध्ये रचलेले मराठीतील ‘गीतासार’ हे पुस्तक लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही एक अभिनव अशी कृती आहे.

गोवा शासन ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रारंभ करण्याच्या सिद्धतेत

गोवा शासन मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करून ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रारंभ करण्याच्या सिद्धतेत आहे; मात्र ‘चार्टर्ड (खासगी छोटी) विमाने’ चालू करण्यासाठी केंद्रशासनाने अनुमती देणे आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

काबुलमधील परिस्थिती आता अधिक सुरक्षित असून ती माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या काळातही नव्हती !

पाक, चीन यांच्यानंतर आता रशियाने तालिबानचे अशा प्रकारे समर्थन करण्याचा केलेला प्रयत्न भारतासाठी मोठा धक्काच आहे. रशियाने अमेरिकेला चपराक लगावण्यासाठी असे म्हटले, तरी भविष्यात रशियाची भूमिका काय असणार, हा प्रश्न भारतासमोर असणार !

काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.

फेसबूककडून तालिबानवर बंदी

‘तालिबान’ एक आतंकवादी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मंचावर या संघटनेला आणि या संघटनेशी संबंधित खात्यांवर बंदी घालत आहोत’, अशी माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे.

सर्वांना लोकल प्रवासासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे लस न घेतलेल्या अथवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आज ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ १८ ऑगस्टला होत असून या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

मनसेचे गजानन काळे यांना लवकरच अटक करणार ! – पोलीस आयुक्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे.

गोव्यात ७ मासांत बलात्काराच्या १४ घटना, तर १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

कळंगुट येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे गोव्यात ‘महिला खरेच सुरक्षित आहेत का ?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे. गोव्यात गेल्या ७ मासांत १४ बलात्कार, १२ विनयभंग आणि १५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंद झाल्या