-
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे आयोजन
-
जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्यांचा सहभाग
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यू.पी.एस्.सी.ची) परीक्षा देऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरूपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ १८ ऑगस्टला होत असून या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आणि साहाय्यक जिल्हाधिकारी संजीता महोपात्रा सहभागी होणार आहेत.
यामध्ये ‘यू.पी.एस्.सी. परीक्षेची सिद्धता कशी करावी ? आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे ? येणार्या अडचणींवर मार्ग कसा काढावा? यांसह विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आणि शंका यांचे निरसन केले जाणार आहे. या उपक्रमात https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492 या लिंंकद्वारे सहभागी व्हावे. यापुढेही या उपक्रमात जिल्ह्यातील विविध अधिकार्यांना सहभागी करून एम्.पी.एस्.सी. परीक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.