माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील उपाहारगृहावर ‘ईडी’ची धाड ! 

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ७ ऑगस्ट या दिवशी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ‘ट्रव्होटेल’ उपाहारगृहावर धाड टाकली आहे.

कोरोनावरील २ डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्यास अनुमती ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

८ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, मॉल उघडण्याविषयीचा निर्णय लवकरच घोषित करण्यात येईल, असेही या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पुण्यात निर्बंध शिथिल, नवी नियमावली घोषित !

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार ! – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते होणार आहे, असे मत व्यक्त केले.

समाज, राज्यघटना आणि संसाधने वाचवण्यासाठी ‘जन आझादी’चा लढा पुकारण्याचा संकल्प ! – मेधा पाटकर

९ ऑगस्ट क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवापर्यंत (१५ ऑगस्ट २०२२) या वर्षभरात स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण स्थानी जनजागृतीपर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक नेत्या मेधा पाटकर यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तुळजापूर येथील ३ मंदिरे सील !

श्री तुळजाभवानी मंदिरालगत असलेल्या अन्नपूर्णा देवी, मातंगी देवी आणि टोळभैरव या उपदेवतांच्या मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत होती.

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप !

रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

उजनी धरणातील अवैध वाळू उपसा करणार्‍या ४० लाख रुपयांच्या ५ बोटी उद्ध्वस्त !

इंदापूर येथील उजनी जलाशयामध्ये गस्त घालत असतांना अवैध वाळू उपसा करणार्‍या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी आणि १ सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या.

मुंबईमध्ये शासकीय भूमीवर २०० हून अधिक अवैध इमारती !

हा प्रकार अतिशय गंभीर असून अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

सप्टेंबर २०२१ पर्यंत बालविवाह प्रतिबंधासाठी राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार !

वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग, युनिसेफ आणि अक्षरा सेंटर यांनी ६ ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ च्या अखेर बालविवाह प्रतिबंधासाठी राज्यव्यापी मोहीम चालू केली आहे.