कोरोना संसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तुळजापूर येथील ३ मंदिरे सील !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याचा राज्यशासनाचा नियम मोडणार्‍या येथील ३ मंदिरांना तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सील केले आहे; मात्र येथे दैनंदिन धार्मिक पूजा विधीसाठी अनुमती देण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरालगत असलेल्या अन्नपूर्णा देवी, मातंगी देवी आणि टोळभैरव या उपदेवतांच्या मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत होती. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना ही गर्दी निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांना कारवाईचे निर्देश दिले होते.