नागपूर – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ७ ऑगस्ट या दिवशी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ‘ट्रव्होटेल’ उपाहारगृहावर धाड टाकली आहे. तेथे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी २ घंटे अन्वेषण केले, तसेच उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी समवेत नेले आहे’, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. देशमुख यांनी देहली येथील बनावट आस्थापनांच्या माध्यमातून स्वतःच्या ‘श्री शिक्षण संस्थे’त ४ कोटी २५ लाख रुपये वळवले आहेत. या माहितीच्या आधारे ‘ईडी’ने ते अध्यक्ष असलेल्या ‘नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (‘एन्.आय.टी.’) महाविद्यालयावरही ६ ऑगस्ट या दिवशी धाड टाकली होती. ‘ईडी’ने देशमुख यांना ४ वेळा ‘समन्स’ बजावले; मात्र त्यांनी अद्याप त्याची नोंद घेतली नाही.