पुणे, ८ ऑगस्ट – कोरोना काळातील निर्बंध शिथिल करत दळणवळण बंदीचे नियम शिथिल केल्याविषयीची नवी नियमावली २ ऑगस्ट या दिवशी घोषित केली होती, मात्र पुणे, सातारा यांसह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसर्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत चालू रहाणार, तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व सेवा दुपारी चारपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. मॉल्सही सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.