दासबोध विक्रीच्या माध्यमातून निधी संकलनासाठी श्रीरामदासस्वामी संस्थानने कुणासही अधिकार दिलेला नाही ! – पू. सु.ग. स्वामी
श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या प्रसारासाठी आणि त्या माध्यमातून सज्जनगडाच्या निधी संकलनासाठी श्रीरामदासस्वामी संस्थानने कुणासही अधिकार दिलेला नाही, तसेच अशी कोणतीही लेखी किंवा तोंडी संमती दिलेली नाही, असा खुलासा संस्थानचे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी पू. सु.ग. स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.