हिंगोली येथे मराठा आरक्षण प्रश्‍नावरून ‘मराठा शिवसैनिक सेने’चे जोडेमारा आंदोलन !

‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच रहाणार आहे. यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांनी दिली.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे ५० सहस्र रुपयांत रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री

रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने संशयित आरोपींशी संपर्क करून ‘फोन पे’च्या साहाय्याने ५० सहस्र रुपये दिले; मात्र इंजेक्शनवरील टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले.

हिंगोली येथे ‘कोविड केंद्रा’त विलगीकरणाच्या भीतीमुळे रुग्णाच्या नातेवाइकाने रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी !

येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णास भेटण्यासाठी गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक वैभव सरकटे (वय ३० वर्षे) यांनी रुग्णालयात जिल्हाधिकारी  येताच ‘ते आपल्याला विलगीकरण कक्षात पाठवतील’, या भीतीने थेट रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली.

कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

‘फॅमिली डॉक्टर’ लढाईत उतरले, तर कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार करू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘फॅमिली डॉक्टरां’नी शासनासमवेत यावे. कुटुंबप्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य आपण उचलावे. तुम्ही लढाईत उतरलात, तर कोरोनाला महाराष्ट्रातून हद्दपार करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तुझ्यावर सदैव राहो गुरुकृपेचा ओघ ।

वैशाख शुक्ल पक्ष तृतीया (१४.५.२०२१) या दिवशी रत्नागिरी येथील सौ. उन्मेषा बेडेकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या आईने त्यांना दिलेले काव्यात्मक आशीर्वाद येथे दिले आहेत.

राज्यातील किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली दुर्गप्रेमींसमवेत बैठक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देणार्‍या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन अन् संवर्धन व्हावे, यासाठी १५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात मुसळधार पाऊस !

तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात १६ मे या दिवशी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसासमवेत गार वारेही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वातावरणात एकदम थंडावा निर्माण झाला होता.

अमरावती येथील आधुनिक वैद्य संदेश गुल्हाणे ‘स्कॉटिश’ संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे पहिले खासदार !

शहरातील रहिवासी आणि सध्या ‘स्कॉटलंड’ येथे वैद्यकीय सेवा देत असलेले आधुनिक वैद्य संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच ‘स्कॉटिश’ संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. या संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत.

निधन वार्ता !

सनातनचे साधक श्री. सुधीर बोर्डे यांचे ज्येष्ठ बंधू सुनील त्रिंबकराव बोर्डे (वय ६० वर्षे) यांचे दिर्घ आजाराने १५ मे या दिवशी नाशिक येथे निधन झाले.