चार जणांविरोधात गुन्हा नोंद
बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथे रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने, तसेच गैरमार्गाने विक्री केल्याप्रकरणी चार जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने संशयित आरोपींशी संपर्क करून ‘फोन पे’च्या साहाय्याने ५० सहस्र रुपये दिले; मात्र इंजेक्शनवरील टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संशय आल्याने नामदेव भालेराव यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.