वैशाख शुक्ल पक्ष तृतीया (१४.५.२०२१) या दिवशी रत्नागिरी येथील सौ. उन्मेषा बेडेकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या आईने त्यांना दिलेले काव्यात्मक आशीर्वाद येथे दिले आहेत.
देवाच्या अखंड अनुसंधानात रहा ।
सोडू नकोस गुरुसेवेचा ध्यास ॥ १ ॥
लागू दे तुला गुरुचरणी जाण्याची आस ।
‘ईश्वरप्राप्ती’ हेच ध्येय निश्चित कर आज ॥ २ ॥
संसार कर गुरुसेवा म्हणूनी ।
घरातील सर्वांची सेवा कर गुरुरूप पाहूनी ॥ ३ ॥
‘सनातन प्रभात’ची सेवा कर भाव जोडोनी ।
प्रारब्धावर मात करून साधनेत पुढे जाण्याची संधी म्हणूनी ।
सेवा दिधली तुला गुरुदेवांनी ॥ ४ ॥
घे भरारी आता ।
झोकून दे गुरुसेवेत आणि रममाण हो गुरुस्मरणात ।
अनंत जन्मांतील पापांचे क्षालन होईल याच जन्मात ॥ ५ ॥
नको जन्म पुन्हा ।
शरण जा गुरुदेवांना ।
कर प्रार्थना गुरुचरणी ।
गुरुकृपा सतत अनुभवण्या ॥ ६ ॥
तुझ्यावर सदैव राहो गुरुकृपेचा ओघ ।
गुरुदेवांची तुझ्यावर अखंड कृपादृष्टी राहू दे ।
करते शरणागत होऊनी गुरुचरणी प्रार्थना ॥ ७ ॥
– सौ. कोमल जोशी (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.५.२०२१)