संभाजीनगर येथे ३० एप्रिलनंतर लस न घेणार्‍यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा महापालिकेचा विचार !

कोरोनावर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोहीम हाती घेत ११५ प्रभागांत लसीकरण चालू केले आहे. ३० एप्रिलनंतर लस न घेणार्‍या ४५ वर्षांवरील नागरिकांवर कारवाई होणार आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा अल्प करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नागपूर खंडपिठाकडून रहित !

भिलाई स्टील प्लांटमधून शहराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने केंद्र सरकारला २२ एप्रिल या दिवशी दिले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा अल्प करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय खंडपिठाने रहित केला आहे.

ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या हातात द्या ! : देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांना सूचना

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ,  आणि तमिळनाडू राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी; निष्काळजीपणा करू नका ! – आमदार प्रशांत ठाकूर

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पहाता याचा संसर्ग रोखण्यासाठी, तसेच ‘कोविड १९ लसीकरण जनजागृती’च्या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘फेसबूक थेट प्रक्षेपणा’द्वारे नागरिकांशी संवाद साधला.

सरकारने जनतेकडून साधना करवून घ्यावी !

‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील. कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी विदेशी प्राध्यापकासह २ धर्मांधांना अटक

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी विदेशी प्राध्यापकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. दीबा ओलिवर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो दुबईमध्ये प्राध्यापक असून भारतात अमली पदार्थ विक्रेता (ड्रग्ज पेडलर) म्हणून काम करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे.

माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यास २४ एप्रिलला काम बंद आंदोलन करू ! – नरेंद्र पाटील

राज्य शासनाने माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना २३ एप्रिलच्या रात्रीपर्यंत रेल्वे आणि बसने प्रवास करण्याची अनुमती दिली नाही, तर २४ एप्रिलला एक दिवसाचा लाक्षणिक संप करू, अशी चेतावणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.