अमली पदार्थ विक्रीप्रकरणी विदेशी प्राध्यापकासह २ धर्मांधांना अटक

मुंबई – अमली पदार्थ विक्रीप्रकरणी विदेशी प्राध्यापकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. दीबा ओलिवर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो दुबईमध्ये प्राध्यापक असून भारतात अमली पदार्थ विक्रेता (ड्रग्ज पेडलर) म्हणून काम करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या आरोपीकडून एम्.डी.एम्.ए. हा अमली पदार्थ कह्यात घेण्यात आला आहे. त्याच्यासह काम करणार्‍या मोहम्मद इमरान अंसारी यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अन्सारीच्या घरी धाड टाकताच त्याने सर्व अमली पदार्थ खिडकीतून खाली फेकून दिले. (धर्मांधांची चलाखी ! – संपादक) या कारवाईत अन्सारीच्या घरातून ९ लक्ष ५० सहस्र रुपये कह्यात घेण्यात आले आहेत.

अन्य एका प्रकरणात सर्फराज कुरेशी याला आग्रीपाडा येथून अमली पदार्थासह अटक केली. त्याच्याकडून २ लक्ष रुपये कह्यात घेण्यात आले.