भगवंत भक्ताचे रक्षण करतो ! भगवंताचे भक्त बना !
कितीही मोठी आपत्ती आली, तरी भगवंताने त्याच्या भक्तांचे रक्षण केले आहे, हे सांगणारी भक्त प्रल्हादासारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’
कितीही मोठी आपत्ती आली, तरी भगवंताने त्याच्या भक्तांचे रक्षण केले आहे, हे सांगणारी भक्त प्रल्हादासारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’
आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !
शहामृगाला जेव्हा कळते की, आता संकट येणार आहे, तेव्हा ते वाळूत डोके खुपसून बसते. त्याला वाटते की, संकट निघून जाईल; पण तसे न होता ते संकट त्याचाच नाश करते. आपल्या सर्वांची स्थिती तशी होऊ नये, यासाठी आता साधना करण्याविना पर्याय नाही !
भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !
नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल !
आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !
महाभयंकर जीवघेण्या आपत्तींमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच ! ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, असे वाटत असेल, तर ‘तो आपल्यावर प्रसन्न होईल’, असे आपल्याला केले पाहिजे. महाभीषण आपत्तीतून वाचण्यासाठी भरवसा देवावरच ठेवावा लागतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १२ – १३ वर्षांपूर्वी सांगितले होते, ‘पुढे येणार्या आपत्काळात वीज नसल्यामुळे लांबवर असलेल्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करता येणार नाही. तोपर्यंत आपली साधना एवढी वाढायला हवी की, एकाच्या मनातील विचार दुसर्याला कळला पाहिजे.’
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे सनातनचे व्यापक ध्येय असल्याने त्यात येणारे अडथळेही मोठे आहेत. सध्याच्या आपत्काळात समष्टी प्रारब्ध म्हणून साधक विविध त्रास भोगत आहेत; पण तरीही ते निःस्वार्थीपणे साधनारत आहेत. ‘आपत्काळात त्रास भोगणे’, ही त्यांची साधनाच ठरत आहे.’