भगवंत भक्ताचे रक्षण करतो ! भगवंताचे भक्त बना !

कितीही मोठी आपत्ती आली, तरी भगवंताने त्याच्या भक्तांचे रक्षण केले आहे, हे सांगणारी भक्त प्रल्हादासारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन त्याच्या भक्तांना दिले आहे. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे कोणत्याही संकटात रक्षण करतोच. भक्त प्रल्हाद, पांडव यांसारख्या अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झाले आहे. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर काही वर्षांपासून ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे आदींच्या माध्यमातून अखिल मानवजातीला कळकळीने सांगत आहेत, ‘आता जिवंत राहण्यासाठी तरी साधना करा !’